साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून डॉ.बाबासाहेब यांनी उच्च शिक्षण घेत सामाजिक कार्य केले. त्यांचे कार्य जगाला प्रेरणा देणारे असल्याचे मत ज्येष्ठ विधीज्ञ डी.एन.बोराडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. वकील संघाच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अनेक सदस्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ॲड.साहेबराव पाटील, ॲड.एस.टी.खैरनार, ॲड.राहुल जाधव, ॲड.आकाश पोळ यांनी विचार व्यक्त केले. यावेळी अधीक्षक गोविंद पवार, ॲड.डी.डी.दसेगावकर, यांनी गीतातून आदरांजली वाहिली. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, जाकीर सय्यद, एच. करंदीकर, ए.बी.मोरे, डी.एस. निकम यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड.कविता जाधव यांनी केले.