Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»डॉ. बाबासाहेबांचे विचार कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    डॉ. बाबासाहेबांचे विचार कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्‍वरत्न आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे अगाध आहे. त्यांच्या विविधांगी पैलूमुळे बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व हे उजळून निघते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही प्रणाली व्यवस्था यांच्यामध्ये एक अतूट नाते बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आणि विचारांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांचे विचार हे कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे. ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा मूलमंत्र जोपासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊ या, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी बोलत होते.

    यावेळी तालुका प्रमुख डी. ओ.पाटील, सरपंच नाना बडगुजर, वाघळुदचे सरपंच हुकुम पाटील, भोदचे सरपंच राजु पाटील, सोसायटीचे चेअरमन मनोज मालु, चिंचपुराचे सरपंच आशाबाई कैलास पाटील, उपसरपंच शिवाजी नन्नवरे, ग्रा.पं. सदस्य कैलास पाटील, गुलाब मोरे, ईश्‍वर सपकाळे, सिद्धार्थ मित्र मंडळ, ग्रा.पं. सदस्य संजय मोखर, प्रकाश लोखंडे, शालिक दोडे, सिराज कुरेशी, आशिष सपकाळे उपस्थित होते. यावेळी बौद्ध वंदना श्री.पालवे यांनी सादर केली. प्रास्ताविक विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, सूत्रसंचालन ग्रा.पं.सदस्य सुनील बडगुजर तर आभार मागासवर्गीय सेनेचे उपजिल्हा प्रमुख नाना भालेराव यांनी मानले.

    असोदा येथे पूर्व संध्येला पुतळ्यास माल्यार्पण

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आसोदा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लखन जोहरे, उपसरपंचपती गिरीश भोळे, तुषार महाजन, सुनील पाटील, उमेश पाटील, जीवन सोनवणे, बापू महाजन, अजय पाटील, शरद नारखेडे, गोटू नारखेडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद मुलीचा शोध सुरू

    March 4, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी दोन जखमी

    March 4, 2026

    Chalisgaon : माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.