साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जामनेर तालुका अंतर्गत तालुक्यातील पहुर येथील जि.प.केंद्रीय मुलांच्या शाळेतील पटांगणावर मंगळवारी सकाळी आरंभ पालक मेळावा उत्साहात घेण्यात आला. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान कार्यक्रमाची घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक दमयंती इंगळे (बालप्रकल्प अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी, जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालप्रकल्प अधिकारी शिलाबाई पाटील, बाल प्रकल्प अधिकारी एस.एस.सोनार, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, ईश्वर देशमुख, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, शरद पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी सुषमा चव्हाण, सोनाबाई हुडेकर, विद्या कुमावत, अर्चना पाटील, वंदना खैरनार, संगीता पडोळ, संगीता भोई, छाया जोशी, लता पवार, मीनाक्षी चौधरी, शोभा पाटील, छाया पाटील, रेखा तायडे, नर्मदा पाटील, गंगा मोरे, विशाखा मोरे, पुष्पा घोलप, अर्चना कुमावत, मोनाली देशमुख यांच्यासह बीटअंतर्गतच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस पालक उपस्थित होते.
