Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»प्रेम करताना जात धर्म बघू नका, स्टेटस ठेऊन अल्पवयीन प्रेमी युगुलाने संपवले जीवन
    क्राईम

    प्रेम करताना जात धर्म बघू नका, स्टेटस ठेऊन अल्पवयीन प्रेमी युगुलाने संपवले जीवन

    saimatBy saimatSeptember 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर :

    कोल्हापूरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांच्या घरातून प्रेमाला विरोध होत असल्याने प्रेमी युगुलाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून जीवन संपवले. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले असून नातेवाईकांची रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणत गर्दी झाली आहे.

    ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला ही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका. प्रेम करताना जात धर्म बघू नका, अशा प्रकारचा स्टेटस ठेवत कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्याने आपले जीवन संपवले असून आत्महत्या केलेला तरुण हा मुस्लिम तर युवती ही हिंदू समाजातील आहे. आत्महत्या केलेला तरुण १८ वर्षांचा तर युवतीचे वय १६ वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. हे दोघेही अल्पवयीन एकाच गल्लीत राहत असून गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते पण दोन्ही समाज वेगळे असल्याने या प्रेम संबंधात घरच्यांकडून विरोध होता.

    अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समजही दिली होती मात्र आपल्या प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.