जामनेरला ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आयोजित डॉक्टरांच्या सत्काराप्रसंगी प्रतिपादन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
कोरोनासारख्या महामारीत डॉक्टरांमुळेच आपण सुरक्षित राहिलो. डॉक्टर हे खरोखरच आपल्या कुटुंबापेक्षा रुग्णाच्या हितासाठीच रुग्णाला अधिक वेळ देतात. त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारे ‘डॉक्टर्स’ हे ईश्वराचे रूप आहे, असे प्रतिपादन प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्यावतीने आपल्या कुटुंबाची काळजी न करता अहोरात्र काम करणाऱ्या जामनेर शहरातील डॉक्टरांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामनेरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी जामनेर शहर डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.के.एम.जैन- ओस्तवाल यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयएमए, जामनेर शहर डॉक्टर्स असोसिएशनमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदात्यांचे प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी कौतुक केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी डॉ.अजय पाटील, डॉ.निळकंठ पाटील, डॉ.सुभाष पवार, डॉ.आशिष महाजन, डॉ. जयंत महाजन, डॉ.योगेश इंगळे, डॉ.दीपक ठाकूर, डॉ.संदीप सरताळे, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.नरेश पाटील, डॉ.मनोज विसपुते, डॉ.आशिष वाघ, डॉ.नंदलाल पाटील, डॉ.जितेंद्र वानखेडे, डॉ.रवींद्र कासट, डॉ.विजय सपकाळ, डॉ.पवन पाटील, डॉ.विनोद भाई, डॉ.मनोज पाटील, डॉ.शीतल पाटील, डॉ.वैशाली चांदा, डॉ.स्वाती विसपुते, डॉ.निवेदिता पाटील उपस्थित होत्या. सूत्रसंचलन डॉ.नरेश पाटील तर आभार डॉ. निळकंठ पाटील यांनी मानले.