प्रा.बालाजी कांबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

0
15

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

वाणिज्य व व्यस्थापनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक बालाजी कांबळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यानी पीएच.डी पदवी देऊन नुकतेच सन्मानित केले.

प्रा.बालाजी कांबळे यांनी ‘A study of the impact of Pradhan Mantri Fasal Bima Yojna in Development of Agriculture Sector in Nanded District , Maharashtra’ विषयावर आपले शोध प्रबंध विद्यापीठास सादर केले होते. त्यांनी प्रा.आर.व्ही.तेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले. याबद्दल प्रताप कॉलेज(स्वायत्त), अमळनेरचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी प्रा.कांबळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, प्रा.जे.सी.अग्रवाल, डॉ.विजय तुंटे, डॉ.मुकेश भोळे, डॉ.आर.सी सरवदे, डॉ.माधव भूसनर, प्रा.जयेश साळवे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here