साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र अँम्युचेर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने येत्या २८ ते ३० नोव्हेंबर २०२३ रोजी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे होणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर (१९ वर्षाआतील) नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे मुले व मुलींचे दोन्ही संघ सहभागी होणार आहे. त्याकरीता जळगाव जिल्हा निवड चाचणी मु.पो.यशवंत पब्लिक स्कूल, वाघळी, ता.चाळीसगाव नेटबॉल मैदानावर रविवारी, १९ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे. १ मार्च २००५ नंतर जन्मलेले खेळाडू चाचणीत सहभागी होवू शकतील. आधार कार्ड झेरॉक्स, ५ पासपोर्ट फोटो, बोनाफाईड, जन्मदाखला सर्व कागदपत्रांची ५ प्रत आदी कागदपत्रांसह जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थितीत रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने सचिव प्रमोद पाटील यांनी केले आहे.
खेळाडूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने निवड चाचणीसाठी अध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे, उपाध्यक्ष खा. उन्मेष पाटील, संचालक परमानंद सूर्यवंशी, मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी, मार्गदर्शक एम.वाय.चव्हाण, अजय देशमुख, सचिव प्रमोद पाटील (९८३४६८००६५), क्रीडा शिक्षक योगेश पांडे (९१७५९२३३२५)अधिक माहितीसाठी वरील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.