साईमत, जळगाव : प्रतिनिधी
स्व. एल.बी. राजपूत यांच्या स्मृतीनिमित्त जळगाव जिल्हा क्रीडा संघातर्फे आयोजित तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला शनिवारी, १४ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला. ही स्पर्धा जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने घेतल्या जात आहे. स्पर्धेत विविध १० गटात ११० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी यांनी अखिल भारतीय विद्यापीठाचे माजी खेळाडू मीरा गाडगीळ आणि श्रीपाद जोशी यांच्यासोबत खेळून केले. यावेळी जिल्हा क्रीडा संघाचे सचिव नितीन अट्रावलकर, कोषाध्यक्ष सचिन गाडगीळ, राजु खेडकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शैलेश जाधव, अमित चौधरी, सुभाष गुजराती आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन ॲड. विक्रम केसकर यांनी केले.