साईमत : जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे मान्यतेने एकलव्य क्रीडा संकुल आयोजित दुसरी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेस एकलव्य क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण साठी प्रमुख पाहुणे डॉ.निलेश चौधरी, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील , कलादर्षचे संचालक सचिन चौघुले, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय चे क्रीडा शिक्षक रणजित पाटील, बाहेती कॉलेज चे क्रीडा शिक्षक हरीश शेळके, एन.आय.एस टेबल टेनिस प्रशिक्षक विजय विसपुते, जळगाव मेडिकल चे संचालक स्वानंद साने, शैलेश जाधव उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विक्रम केसकर यांनी केले. कार्यक्रमास एकलव्य टेबल टेनिस प्रशिक्षक विजय विसपुते, अॅड. विक्रम केसकर , शैलेश जाधव, अमित चौधरी, स्वानंद साने यांचे अनमोल सहकार्य लाभले.



