आमडदेतील विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची मैदानी क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

0
12

संस्थेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून केला गौरव

साईमत/भडगाव/प्रतिनिधी

येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित आमडदेतील सौ.साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेतील चार विद्यार्थ्यांची मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

स्पर्धेत १७ वर्षाच्या आतील गटात इयत्ता दहावीचा विद्यार्थी विशाल लोटन पाटील हा १०० मीटर धावणे तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आल्याने त्याची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. त्यानंतर कल्पेश सुनील पाटील हा विद्यार्थी ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय आल्याने त्याचीही निवड जिल्हास्तरावर केली आहे. त्यानंतर १९ वर्षाच्या आतील गटात इयत्ता ११वी सायन्सचे दोन विद्यार्थ्यांपैकी कुणाल भाऊसाहेब पाटील हा ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुका स्तरातून द्वितीय क्रमांकाने विजयी झाल्याने व हितेश संजय पाटील हा विद्यार्थी भालाफेक स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय आल्याने दोन्ही विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरासाठी केली आहे.

निवडीबद्दल विद्यालयातर्फे त्यांचा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे मानद सचिव तथा कै.दीनानाथ दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन जगदीश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.वळखंडे, पर्यवेक्षक अमृत देशमुख यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक व्ही.बी.पवार, एम.के.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here