राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त बोदवड येथे आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.
साईमत /बोदवड/प्रतिनिधी –
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त बोदवड येथे आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी १३ ते ३० वयोगटासाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या मिराताई दिनेश माळी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोदवड पोलीस निरीक्षक अरविंद भोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, माजी नगराध्यक्ष, आ.चंद्रकांत पाटील यांचे चिरंजीव हर्षराज पाटील, अनुप हजारी, नगरसेवक सुनील बोरसे, दिनेश माळी, निलेश माळी, हर्ष बडगुजर, देवा देवकर, अनंत वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
भव्य मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक वैभव पुरुषोत्तम बरडे (बुलढाणा), द्वितीय सचिन श्रावण राठोड (पळसखेडा, बोदवड) तर तृतीय आकाश रमेश बारवाल यांनी पटकावला. मुलींच्या गटात प्रथम क्रमांक साक्षी दिनेश महाजन (रसलपूर, ता.रावेर), द्वितीय जानवी चंद्रकांत सपकाळे (रावेर) आणि तृतीय दिपाली रमेश पाटील (मुक्ताईनगर) यांनी मिळवला.याचवेळी घेण्यात आलेल्या ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक सलोनी संजयकुमार कापसे (बरडीया स्कूल), द्वितीय सार्थक प्रमोद मराठे (न.ह.राका हायस्कूल) आणि तृतीय कार्तिक अनिल कोल्हे (न.ह. राका, बोदवड) यांनी पटकावला. या स्पर्धेत १३ ते ३० वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुलींसाठी तीन किलोमीटर तर मुलांसाठी चार किलोमीटर अंतराची शर्यत ठेवण्यात आली होती.
यावेळी अमोल देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांनी जिजाऊ जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. सर्व यशस्वी स्पर्धकांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत मुक्ताईनगर, रावेर, मलकापूर, कुसुंबा, जळगाव, जळगाव जामोद, पाचोरा, वरणगाव, नाशिक, कापूसवाडी, शिलापूर आदी विविध तालुके व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष शैलेश वराडे यांच्यासह दीपक खराटे, गणेश मुलांडे, गणेश सोनवणे, राजेंद्र वराडे, ए.पाटील (एणगाव), के.बी. पाटील स्कूल नाडगाव, रेणुका स्कूल तसेच संदीप व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.
