पुरुषांच्या नसबंदीसाठी लाभार्थ्यांचे मत परिवर्तन करण्याचे आवाहन
साईमत/जामनेर/प्रतिपादन :
तालुक्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी शस्त्रक्रिया तसेच साधनांद्वारे उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजनासह दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.
२०२४- २०२५ या वर्षात जामनेर तालुक्यात १ हजार १९५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
पुरुष नसबंदी ही स्त्री शस्त्रक्रियेपेक्षा सुलभ आणि सोपी आहे. त्यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी पुरुषांच्या नसबंदीसाठी लाभार्थ्यांचे मतात परिवर्तन करावे, असे प्रतिपादन डॉ. भायेकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मोहित जोहरे, डॉ.संदीप कुमावत, डॉ.शारीक कादरी, डॉ.सागर पाटील, डॉ.कोमल देसले, डॉ.दानिश खान, डॉ. हर्षल भटकर यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी बशीर पिंजारी, गोपाल पाटील, त्र्यंबक तंवर, सोनल पाटील, प्रदीप पाटील, सुयोग महाजन, सलील पटेल, आशा कुयटे, शिवली देशमुख, प्रतिभा चौधरी, अनुराधा कल्याणकर, गजाजन माळी, सुधाकर माळी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी तर डॉ. मोहित जोहरे यांनी आभार मानले.