District Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यावल, रावेर नगरपरिषद निवडणूक विषयक कामाचा आढावा

0
16

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

साईमत/यावल/प्रतिनिधी :  

यावल व रावेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कामकाज संदर्भात यावल व रावेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची पूर्वतयारीबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी त्यांनी यावल नगरपरिषद कार्यालयास भेट दिली. तसेच तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रुमची पाहणी केली. यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक मतदान केंद्रावर मतदारांसाठी दिल्या जाणाऱ्या सोईसुविधा, मतदान जागृती आदी विषयांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी घुगे यांनी यानंतर रावेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेतील उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज, मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. मतदानाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात त्यांनी प्रशिक्षणास उपस्थितांना सूचना दिल्यात. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल, याबाबत दक्ष राहण्याचे सांगितले.

निवडणूक मतदान प्रक्रियेचे सर्व कामकाज समजून घ्यावे तसेच मतदारांना मतदानाच्या दिवशी काही अडचण आल्यास मदत करावी,मतदान प्रक्रिया संदर्भात मतदारांना माहिती होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जनजागृती करावी.अशा सूचना जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी दिल्यात.या प्रसंगी रावेरचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावेर बंडु कापसे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here