Review by the District Collector ; अडावद येथे जनगणनेच्या प्रायोगिक कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

0
5

जनगणना हे राष्ट्रीय कार्य – नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी रोहन घुगे

साईमत/अडावद, ता.चोपडा -/प्रतिनिधी :  

चोपडा तालुक्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू असलेल्या जनगणना कार्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंगळवारी सायंकाळी अडावद गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी जनगणनेचे काम पाहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामातील अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, जनगणना हे राष्ट्रीय कार्य असून सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, ही जनगणना जातीनिहाय नसून केवळ लोकसंख्येची जनगणना आहे. हे प्रायोगिक कार्य यशस्वी ठरल्यास पुढील काळात याची अंमलबजावणी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्य आणि देशभर होणार आहे.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मंडळाधिकारी अजय पावरा, तलाठी वीरेंद्र पाटील, सरपंच बबन तडवी, ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाणे, सचिन महाजन, पी.आर. माळी, रियाज अली सय्यद, मनोहर पाटील, हनुमंत महाजन, जावेद खा, रेहान मलिक आणि शेख तायर शेख रझ्याक आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे अडावद परिसरातील जनगणना कार्यास गती मिळाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here