Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जिल्हाधिकारी–रेल्वे व्यवस्थापकांची बैठकीत समन्वय अधिक दृढ करण्यावर भर
    जळगाव

    Jalgaon : जिल्हाधिकारी–रेल्वे व्यवस्थापकांची बैठकीत समन्वय अधिक दृढ करण्यावर भर

    saimatBy saimatFebruary 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: District Collector-Railway Manager meeting focuses on strengthening coordination
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वे–जिल्हा प्रशासनाने केली सविस्तर तयारी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी 

    जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली.

    या बैठकीत आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी, प्रवासी सुविधा, वाहतूक नियोजन आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यात आला. जिल्हाधिकारी घुगे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मेळ्याच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

    याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, सक्षम प्राधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण आणि भूसंपादनाची कार्यवाही अधिक गतीमान करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.

    जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामधील सकारात्मक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करत, प्रकल्पांची वेळेत आणि सुस्थितीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. यावेळी स्पष्ट करण्यात आले की, जळगावच्या सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत विकासाच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनासोबत सातत्यपूर्ण समन्वय राखून कार्यरत राहिले जाईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon ; जळगावात पोलीस चौकीजवळून महिंद्रा मॅक्सिमो मिनी व्हॅन चोरी

    February 5, 2026

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Scarlet : शेंदुर्णीत मद्यविक्रीविरोधातील मोर्चा स्थगित

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.