साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने, नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन, नंदुरबारतर्फे ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या १६ वी राज्यस्तरीय सबज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा मुला-मुलींचा संघ जाहीर केला आहे. स्पर्धेसाठी निवड झालेला संघ रवाना झाला आहे.
निवड समितीचे अध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे, उपाध्यक्ष खा. उमेश पाटील, य.प.स्कूलचे संचालक परमानंद सूर्यवंशी, मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी, सचिव प्रमोद पाटील, मार्गदर्शक एम.वाय.चव्हाण, जळगाव जिल्हा नेटबॉल प्रशिक्षण क्रीडा शिक्षक योगेश पांडे यांच्यासह सदस्यांनी जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनतर्फे यशवंत पब्लिक स्कूल वाघळी, ता.चाळीसगाव विद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा निवड चाचणीतून संघ जाहीर करण्यात आले. पंच अधिकारीपदी वाल्मीक गवळी, भगवान राखुंडे, प्रकाश महाजन यांची जिल्ह्यातून निवड झाली आहे.
मुलांचा संघ असा
मुलांच्या संघात लवणेश पाटील (कर्णधार), नवकार जैन(उपकर्णधार), पवन गवळी, पवन पाटील, रोहित गवळी, गणेश सूर्यवंशी, दर्शन सुराणा, आदित्य पाटील, पवन कुंभार, गौरव पाटील, राज पाटील, प्रसन्ना साठे (राष्ट्रीय विद्यालय ज्यु कॉलेज, चाळीसगाव)(यशवंत पब्लिक स्कूल, वाघळी), (स्वामी समर्थ विद्यालय, पारोळा), (गुड शेफर्ड अकॅडमी, चाळीसगाव) अशा शाळेतील विद्यार्थ्यांची निवड केली आहे. तसूच व्यवस्थापक म्हणून प्रमोद पाटील तर प्रशिक्षक म्हणून योगेश पांडे यांचा निवडीत समावेश आहे.
मुलींचा संघ असा
मुलींच्या संघात प्रांजल चौधरी (कर्णधार), प्रतिक्षा घोळे (उपकर्णधार), कनिष्का चौधरी, निशा पाटील, उर्वशी आमले, लक्ष्मी राठोड, नंदिनी पाटील, आर्या सूर्यवंशी, श्रावणी माळी, हर्षदा ठाकरे, दीपलक्ष्मी आमले (सर्व यशवंत पब्लिक स्कूल, वाघळी) यांची तर व्यवस्थापक म्हणून साक्षी चौधरी, प्रशिक्षक योगेश पांडे यांचा निवडीत समावेश आहे.