माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्या स्तुत्य उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव तथा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्यातर्फे इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील २०० विद्यार्थ्यांना मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी रा.काँ.शरद पवार गटाचे आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी रा.काँ.शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. रवींद्रभैय्या पाटील होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, एजाज मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा सरचिटणीस वाय.एस.महाजन, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक राजु मोरे, सुनील माळी, डॉ.रिजवान खाटीक, ओबीसी सेल आघाडी महानगरचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, महानगरचे जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, अरुण मेटकर, आदिवासी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, संचालकांमध्ये गजानन लाडवंजारी, रामचंद्र लाडवंजारी, भगवान लाडवंजारी, संतोष चाटे तसेच नामदेव वाघ, मोहन पाटील, नामदेव पाटील, रहीम तडवी, योगेश लाडवंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार
कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमाच्या अध्यक्षांसह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद पाटील, वाय.एस.महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन आ.एकनाथराव खडसे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी रवींद्र भैय्या पाटील यांनी अशोक लाडवंजारी यांच्या कार्यासह सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच निश्चितच विद्यालयातील विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती साधतील, असा आशावाद व्यक्त केला.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख अमित तडवी, प्रतिभा पाटील, दिनेश पाटील, सांस्कृतिक उपप्रमुख सरस्वती पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी नाथ फाउंडेशन तथा श्रीराम प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी, मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अतुल चाटे तर आभार अमित तडवी यांनी मानले.