मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गणवेशाचे वाटप

0
18

साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर :

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर आणि स्व.दे.ना.पाटील हायस्कुल, चौबारी शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम मंत्री ना.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते. यावेळी ना. अनिल पाटील यांनी श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी दिल्या जाणाऱ्या साहित्याबद्दल कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या माध्यमातून संस्थेच्या हजारावर विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश पुरविले जातात. यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे, स्व. दे.ना.पाटील हायस्कुल चौबारीचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ना. पाटील यांचा सामूहिक सत्कार केला.

याप्रसंगी सरस्वती विद्या मंदिरचे आनंदा पाटील, संगीता पाटील, गितांजली पाटील, धर्मा धनगर, पूनम पाटील, शितल पाटील, प्राथमिक विद्या मंदिर बहादरपूर रोड, अमळनेर शाळेचे अनिता शिसोदे, सुमेध मोहिते, सुनील धनगर, दिनेश शिरसाठ, गोविंदा माळी, दिनेश साळुंखे, समाधान शिंदे तसेच चौबारी हायस्कुलचे पी.एन.पाटील, पी.पी.पाटील, लिलाधर पाटील, चेतन पाटील, मेघन पाटील, संस्थेचे सागर भावसार, श्रीमती मोरे, सारिका पाटील, विद्या पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजीत शिंदे यांनी केले.

सकस आहारासह प्रोटीन किटचे वाटप

एचआयव्हीसह जगणाऱ्या मुला-मुलींना माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्याकडून सकस आहार व प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर आणि रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री पाटील, स्वीय सहाय्यक एल.टी.पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी चेलाराम सैनानी, विवेक देशमुख होते. तसेच पाहुण्यांचे स्वागत आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ.भारती पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद, रोटरी क्लबचे सचिव विशाल शर्मा, प्रतीक जैन यांनी केले.

यशस्वीतेसाठी नथ्थु चौधरी, पूनम पाटील, रोटरी क्लबचे सदस्य विजय पाटील, निलेश पाटील, महेश पाटील, ईश्वर सैनानी, किशोर लल्ला यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. भारती पाटील तर सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here