साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ ह्या या अभियानात सहभागी होत जळगांव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आज खेळाडूंना विनामूल्य राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.
जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्या हस्ते खेळाडूंना ध्वज देण्यात आले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर ध्वज लावावा तसेच ध्वज संहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजु खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी,कोषाध्यक्ष बाबा शिर्के, टेनिस प्रशिक्षक कृपालसिंग ठाकूर, जेष्ठ खेळाडू युवराज वाघ, नाना राजपूत,नितीन पाटील,ज्ञानेश्वर कोळी,किरण चौधरी,दादा जोशी,विजय सोनवणे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.