साईमत /न्यूज नेटवर्क / जळगाव
मंदिर उभे करणाऱ्या प्रमाणे या मुलाचे जीवन रुपी मंदिर घडविण्याचे काम कित्येक वर्षापासून सुधर्मा संस्था करीत असून या कार्यामुळे अज्ञानाचा काळोख निश्चित दूर होत असल्याचे प्रतिपादन डी डी बच्छाव यांनी केले. ते सुधर्मातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतांना भाऊचे उद्याने येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सुधर्मा ज्ञानसभा सामाजिक संस्थेने परिसरातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आपली शक्ती केंद्रित केली आहे. सुधार्माच्या वतीने सावखेडा बुद्रुक, खेडी बुद्रुक,तांबापुरा, मेहरून, समतानगर परिसरातील गरीब कुटुंबातील ६५ विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन,पेन्सिल, रबर, शॉपनर, फाईल, चित्रकलेची वही, क्रेयॉन्स कलर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी डी बच्छाव, रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद बोरुडे उपस्थित होते. हेमंत बेलसरे यांनी प्रास्ताविक करतांना म्हणाले की, सुधर्माचे दोन विद्यार्थी पोलीस व दोन विद्यार्थी इंजिनिअर आणि मॅनेजर झाले आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप बोरुडे यांनी आपण स्वतः उरलेल्या पानाच्या वह्या शिवून वापरल्यावर जुनी पुस्तके घेऊन अभ्यास करून बीए, डीएड केले, नंतर एमपीएससी परीक्षा देऊन पोलीस खात्याची नोकरी मिळवली. तुम्ही पण मेहनत करा अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष द्या. सुधर्मासारखी चांगली संस्था तुमच्या सर्व अडचणी सोडवत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच यशस्वी व्हाल असे सांगितले.
यावेळी महामार्ग पोलीस हितेश पाटील यांनी महामार्गावर झालेल्या अपघातात मोलाची मदत करून अपघात झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले त्यांचा या कार्याबद्दल सुधर्मा संस्थेने त्यांचा शाल, भगवद्गीता व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे आभार दिनकर बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डी.डी. बच्छाव सर , प्रवीण पुराणिक , योगेश सोरमारे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी परिश्रम सूर्यकांत हिवरकर, सुनिता बेलसरे, नितीन तायडे, राहुल सोनवणे, गायत्री पाटील, सुवर्णा मराठे यांनी घेतले.