साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ७०० भाविकांना रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले. रात्री ८ वाजता रमेश पेहलानी गु्रपच्या कलावतांनी विविध भक्तीगित सादर केल्याने परिसरातील भाविक मंत्रमुग्ध झाले होते. रुद्राक्ष घेण्यासाठी सोमवारी, ४ सप्टेंरबर रोजी सकाळी ९ वाजता दूध फेडरेशन, खोटे नगर, पिंप्राळा, मयूर कॉलनी, गणपती नगर, प्रल्हाद नगर, पांडुरंग साई नगर, हुडको, ओंकार पार्क, श्रीराम नगर, कुंभार वाडा, कोळी वाडा, चंद्रकला अपार्टमेंट, मुरली मनोहर अपार्टमेंट, सावखेडा, सोनी नगर आदी परिसरातील ७०० भाविकांना रूद्राक्षाचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी ७ वाजता रमेश पेहलानी, किशोर मोरे, नगरसेवक सुरेश सोनवणे, संतोष पाटील तसेच कंजरभाट युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय अभंगे, मोहन गारुंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, संतोष रायचंदे, संदीप बागडे, गौतम बागडे, संदीप गारूंगे, विनय नेतलेकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
भक्ती गीतांची प्रेक्षकांकडून प्रशंसा
भक्ती गीताच्या कार्यक्रमात रमेश पेहलानी, किशोर मोरे, प्रमोद जोशी, नितीन वाघ, सुनील सरदार, सिध्दार्थ बैसाणे, अशोक भावसार, सुभाष मिस्तरी, मयूर पाटील, रफीक पिंजारी, हेमंत बारी, श्रीहरी मराठे, जगदीश गंगावणे, विश्वनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, संदीप सोनार, हेमराज गोयर यांनी मराठी, हिंदी विविध भक्तीगीत सादर केले. यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट करुन प्रशंसा केली.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी नरेश बागडे, देविदास पाटील, मधुकर ठाकरे, विजय चव्हाण, सरदार पाटील, विनोद निकम, धनंजय सोनार, सागर बोरसे, लोकेश शर्मा, हेमराज गोयर, भैय्यासाहेब बोरसे, नारायण येवले, प्रितेश राजपूत, महिला मंडळ माधुरी येवले, मनिषा चव्हाण, सुनिता राजपूत, कल्याणी राजपूत, आशा भोई, उषा बोरसे, ज्योती भावसार, संगिता कोळी, हेमलता चावरीया आदींनी परीश्रम घेतले.



