साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्याजवळील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्या हस्ते सिद्ध केलेले रुद्राक्ष भाविकांना वाटप करण्यात येणार आहे.
तसेच सायंकाळी ७ वाजता आ.सुरेश भोळे (राजु मामा), नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी तसेच कंजरभाट युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय अभंगे, शशिकांत बागडे, राहुल नेतलेकर, संतोष रायचंदे, योगेश बागडे, मोहन गारूंगे, सचिन बाटुंगे संदीप बागडे, क्रांती बाटुंगे, गौतम बागडे, संदीप गारूंगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता रमेश पेहलानी गु्रप प्रस्तुत भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.