७ कुपोषित बालकांना १२ हजारांचे पोषण आहाराच्या किटचे वाटप

0
7

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीकडून ग्रामनिधीमधील महिला बालकल्याणच्या दहा टक्के निधीमधुन गावातील ७ कुपोषित बालकांना १२ हजार रुपयांचे पोषण आहाराचे किराणा किटचे वाटप विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते नुकतेच वाटप करण्यात आले.

तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीच्या राजीव गांधी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विस्तार अधिकारी कठाडे यांनी शासनाच्या आदेशानुसार ‘कुपोषण मुक्त भारत’ अभियानातंर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप करावे, असे सुचविले. त्या अनुषंगाने कळमसरे ग्रामपंचायतमार्फत दरवर्षी कार्यक्रम घेतला जात असल्यामुळे ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यापुढे एकही कुपोषित बालक गावात आढळणार नाही, त्याची दक्षता घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. यावेळी नीमचे ग्रामसेवक जगदीश पवार, रमेश चौधरी, अंगणवाडी सेविका, पालक वर्ग, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here