माजी विद्यार्थ्याने ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून राबविला स्तुत्य उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील आसोदा येथील समर्थ ॲक्वाचे संचालक जनार्दन तोताराम कोल्हे यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिक तोताराम चावदस कोल्हे यांच्या स्मरणार्थ १५० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल महाजन होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते.
यावेळी जनार्दन कोल्हे म्हणाले की, मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेप्रती असलेल्या आपुलकी आणि ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून उपक्रमाचे आयोजन करायचे ठरविले. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गोपाळ महाजन, सूत्रसंचालन शुभांगिनी महाजन तर आभार अनिता पाटील यांनी मानले.