साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील गायरान आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १७५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे,ब्लॅकेट, आंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य,गहू तांदूळ, पणत्या, साबण, अगरबत्ती, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले.
दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील गायरान येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष होते.
उपक्रमाचे दाते
राजेश्वरी संधानशिवे, हर्षद महाजन, दीपक चौधरी, राजेश सुराणा, सुनिल पटेल, विनोद तलरेजा, डॉ.मनोज चौधरी, सुनिल चौधरी, कुंदन सोनवणे, जय पाठक, लैलेश मास्टे, हरिष फालक, रघुनाथ आप्पा सोनवणे, किशोर पाटील, दिलीप सूर्यवंशी, विनोद अग्रवाल, आनंदा पाटील, वर्षा पाटील, सरला पाटील, मालती तायडे, प्रवीण कोळी, राजू गायकवाड, डॉ.नीलिमा नेहते, प्रवीण बऱ्हाटे, विनय भोगे, स्मिता जोशी, श्रीकांत मोटे, सारीका भालेराव, लतीफ तडवी, राकेश रानडे, प्रशांत कोल्हे, आरिफ तडवी, ललित पाटील, क्रांती साळुंखे, इस्माईल तडवी, भरत बऱ्हाटे, भूषण कोटेचा, सचिन पाचपांडे, प्रकाश बेलसरे, किरण महाजन, ज्ञानेश्वर मोरे, तात्या करांडे, विजय देवरे, गंगाराम फेगडे, ज्ञानेश्वर घुले, भारती पाटील, मंगेश पाटील, सुनिल माळी, विनोद चोरडिया, संदिप पवार, निलेश पाटील, विनोद तायडे, अरुण फेगडे, राजाराम मोरे, सुवर्णा कुलकर्णी, ममता चौधरी, अतुल चौधरी, उमेश तळेले, मनोज फालक, तुषार नाईक, रजनी रझोदकर, पुष्पा चौधरी, जयश्री काळवीट, अनिल पाटील, शरद हिवरे, मनमोहन करसाळे, सतीश कुलकर्णी, देवलसिंग पाटील, दिपक तायडे, विकास वारके, अमोल जावळे, मोहन सरदार, संदिप पाटील, रामचंद्र खर्चे, मोहम्मद आबिद, मिलिंद सुरवाडे, मंगला रामावत
प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, तर सह समन्वयक अमित चौधरी, विक्रांत चौधरी, भूषण झोपे हे हाेते.अमोल हरीभाऊ जावळे, योगेश इंगळे, श्रीकांत जाेशी, जीवन महाजन, समाधान जाधव, संजय भटकर, प्रसन्ना बाेराेले,श्याम माळी, राजु सोनवणे, प्रा.श्याम दुसाने, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हरीश भट, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन,संदिप रायभोळे, दिपक जावळे, शैलेंद्र महाजन, मिलिंद राणे, रुपेश पाटील, राहुल भारंबे, भरत इंगळे, विपीन वारके ,ललित महाजन, नितिन लोखंडे, उमेश फिरके, शैलेंद्र वासकर, दिलीप कलाल, किरण नेमाडे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
उप्रकाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जाेरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे या उपक्रमास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लाेकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे, सह समन्वक अमित चौधरी, विक्रांत चौधरी, भूषण झोपे यांनी दिली. शहरी लाेक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.