साईमत कजगाव प्रतिनिधी
कजगाव तालुका भडगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली, यावेळी कजगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य अधिकारी, यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामपंचायत सदस्य यांच्या तर्फे कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना लागणाऱ्या गोळ्या औषधीचे किट ग्रामपंचायतच्या मार्फत देण्यात आले. यावेळी सरपंच रघुनाथ महाजन ,उपसरपंच हाजी शफी मण्यार , मा, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ महाजन , सरपंच पुत्र अनिल महाजन , राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अशोक राजपूत , मनोज धाडीवाल, मांगीलाल मोरे, संभाजी पवार , अनिल महाजन (टेलर), धर्मा हिरे , दिनेश टेलर , पुंडलिक सोनवणे , राकेश महाजन ,व सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.