कुपोषित बालकांना ‘आहाराचे महत्त्व’ विषयावर मार्गदर्शन
साईमत। जामनेर।प्रतिनिधी।
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार प्रथम तिमाहीत आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धडक अंगणवाडी तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात कुपोषित बालकांची निश्चिती करून त्यांना अतिरिक्त आहार व आवश्यक औषधी देऊन उपचार करण्यात आले. त्यात सुधारणा न झालेल्या कुपोषित बालकांसाठी जून अखेर बालरोग तज्ज्ञांकडून तालुकास्तरावर तपासणी व उपचार करण्यात आले. बालकांना लागणाऱ्या अतिरिक्त औषधीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दाते शोधून पहुरच्या ग्रामीण रुग्णालयात बालकांना औषधींचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मोना महाजन, डॉ.मनीषा पाटील होत्या.
याप्रसंगी डॉ.विजया पाटील यांनी कुपोषित बालकांना ‘आहाराचे महत्त्व’ विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ.राहुल निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.संदीप कुमावत, मंदाताई हटकर, योगिता नागरे, सतीश बनसोडे, विजू माळी, लहू पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका निशा तेली, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
यशस्वीतेसाठी डॉ.विजया पाटील, डॉ.धनंजय पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.जितेंद्र वानखेडे, सूत्रसंचालन डॉ.धनंजय पाटील तर आभार मोनाली साबळे यांनी मानले.