फत्तेपूर परिसरातील गावांच्या दिव्यांगांची उपस्थिती
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील फत्तेपूर येथील सरस्वती इंग्लिश स्कूलमध्ये दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन विरार यांच्याकडून ब्लॅकेट आणि चटईचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन विरारचे अध्यक्ष संदीप सिंग होते. त्यांनी दिव्यांग बांधवांची गरज लक्षात घेत थंडीचे दिवस असल्यामुळे दिव्यांग बांधवांना ब्लॅकेट आणि चटई आवश्यक असते. अशाप्रकारे त्यांना वेळोवेळी मदत करत राहणार, दिव्यांग बांधव त्यांच्या हिमतीने लढत असतो. त्यांना भविष्यात आम्ही मदत करत राहु, असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी फत्तेपूर परिसरातील, किन्ही, पिंपळगाव, लोणी, मेहगाव पिंप्री, निमखेडी गावातील दिव्यांग बांधव आले होते. चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशनचे अमरिन पेंटर ट्रस्टी, वैभव खेडेकर, राकेश नेमन, रिना नवले यांनी दिव्यांग बांधवांना त्यांच्या हस्ते ब्लॅकेट आणि चटई दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन राहुलराॅय मुळे, योगिता चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन मनोज पाटील, मनोज शिंदे तर आभार राहुलराॅय मुळे यांनी मानले.