३२२ मतदान केंद्रांचा समावेश, साहित्य वाटपसाठी २२ टेबल
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी १९ रोजी एस.एम.कॉलेज येथून ३२२ मतदान केंद्रासाठी निवडणूक निरीक्षक स्मिताक्षी बरूवा यांच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप केले. साहित्य वाटप करण्यासाठी २२ टेबलचे नियोजन केले होते. सकाळी आठ वाजता ऑर्डर फॅक्टरी, वरणगावचे डीजीएम सूक्ष्मनिरीक्षक ए.के.सिंग यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरातील एस.एम.कॉलेज येथील स्ट्राँग रूम उघडण्यात आली.
पोलिंग टीम मतदान केंद्रावर एस.एम.कॉलेज येथून सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत नेमून दिलेल्या मतदान केंद्र ठिकाणी रवाना झाल्या आहेत. पोलिंग पार्टी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर सुस्थितीत पोहोचल्या आहे की नाही, यासाठी ३१ क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी केली आहे. तसेच एस.एम.कॉलेज, मुक्ताईनगर येथे टपाली मतदानासाठी टपाली मतदान केंद्र स्थापित केले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात तीन महिला संचलित मतदान केंद्र, पाच आदर्श मतदान केंद्र, एक युवा मतदान केंद्र, दोन दिव्यांग मतदान केंद्र तयार केले आहेत.