पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते २४० पात्र दिव्यांगांना साहित्याचे वाटप

0
29

८० श्रवण यंत्र, ६८ तीन चाकी सायकल, ३९ जणांना व्हीलचेअरचा समावेश

साईमत/सोयगाव /प्रतिनिधी :

शहरातील पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील २४० पात्र दिव्यांगांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे मागीलवर्षी दिव्यांगांची तपासणी केली होती. तपासणीत सोयगाव तालुक्यातील २४० दिव्यांग पात्र ठरले. भारत सरकार अंगीकृत अलिम्को संस्थेद्वारे २४० पात्र लाभार्थ्यांमध्ये सहा जणांना बॅटरीवर चालणारी सायकल, ६८ जणांना तीन चाकी सायकल, ३९ जणांना व्हीलचेअर, ८० जणांना श्रवण यंत्र तर ४७ जणांना वॉकिंग स्टिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सोयगाव गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, माजी उपसभापती धरमसिंग चव्हाण, गटनेते अक्षय काळे, कदीर शहा, राजू दुतोंडे, गजानन ढगे, कुणाल राजपूत, हर्षल काळे, संदीप सुरडकर, सलीम पठाण, सुरेश चव्हाण, शेख बबलू, राधेश्याम जाधव, राजू रेकनोद, विनोद राठोड, हिरा चव्हाण, श्रीराम चौधरी, समाधान तायडे, सांडू तडवी, वसंत बनकर, रमेश गव्हांडे, दिलीप देसाई, सांडू राठोड, नारायण राठोड, श्रवण जाधव यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here