साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेंदुर्णी येथील शिवभोजन केंद्राला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या मुलांना मोफत शिवभोजनचे वाटप करण्यात आले. शिवभोजन केंद्राचे संचालक विलास पाटील यांच्या शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी अरविंद चितोडीया यांनी भेट देऊन शिवभोजन थाळ्यांचे वाटप केले. शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी सर्वसामान्य व्यक्तीला दहा रुपयात परवडणारी आणि उच्च दर्जाचे जेवण मिळत असल्याची भावना चितोडीया यांनी व्यक्त केली.
शासनाच्या माध्यमातून मिळत असलेल्या शिवभोजन थाळीची पाहणी करण्यासाठी आणि योजनेचा सर्वसामान्य जनतेला फायदा मिळत आहे की नाही त्याची माहिती घेण्यासाठी चितोडिया येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण पाटील, विनोद सोनवणे, रोहित पाटील, दर्शन पाटील, अजय कोळी, रितेश पाटील, भैय्या गुरव, नरेश कोळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.