Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»अंतर्नाद तर्फे गणेशोत्सवात ५ दिवसात २२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
    भुसावळ

    अंतर्नाद तर्फे गणेशोत्सवात ५ दिवसात २२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

    SaimatBy SaimatSeptember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत भुसावळ प्रतिनिधी

     

    शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला.या वेळेस उपक्रमाचे सातवे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात अक्षरमित्र पुस्तक, पाटी, पेंसील, वह्या, पेन, रंगपेटी, पट्टी, खोडरबर या वस्तुंचा समावेश आहे.

    निरंतर पाच दिवसापासून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा समारोप जिल्हा परिषद शाळा पिळोदे बु तालुका यावल येथे करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात भुसावळ तालुक्यातील प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा येथून झाली, त्यात नंतर मांगी तालुका रावेर जिप शाळा, भुसावळ तालुक्यातील जिप शाळा खेडी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

    महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी दाखवलेल्या मार्गाने अंतर्नाद प्रतिष्ठानची वाटचाल सुरु आहे. भविष्यात ह्या शैक्षणिक चळवळीला व्यापक स्वरुप यावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच छायाताई पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप इंगळे, सदस्य चित्रा भालेराव, ग्राम पंचायत सदस्य मयूर जवरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख विक्रांत चौधरी यांनी तर अंतर्नादच्या उपक्रमाविषयी समन्वयक अमित चौधरी यांनी माहिती दिली.आभार सह समन्वयक ललित महाजन यांनी मानले.या प्रसंगी गस कर्ज समिती अध्यक्ष योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, डॉ.संजू भटकर, अमितकुमार पाटील, जिवन महाजन, समाधान जाधव, कुंदन वायकोळे, ज्ञानेश्वर घुले, तेजेंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

    दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी

    उपक्रमास राजेश्वरी संदानशीवे, दीपाली पाटील, किशोर पाटील, अतुल चौधरी, गिरीश भारंबे, श्रीकांत मोटे, चारुलता नेमाडे, ललित पाटील, राजू बोंडे, अमोल जावळे, अरुण फेगडे, डॉ.महेश फिरके, अलका सुरवाडे, भूषण कोटेचा, मोहन महाजन, प्रवीण बऱ्हाटे, उमेश फिरके, विपीन वारके, योगेश सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

    दात्यांची संख्या वाढावी

    दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब गरजवंत विध्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागवण्याचा प्रयत्न एक दुर्वा समर्पणाची उपक्रमाच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात मोठी गणेश मंडळ या उपक्रमासोबत जुळल्यास मोठ्या प्रमाणात गरजवंत विदयार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची गरज पूर्ण करता येईल असे प्रकल्प प्रमुख विक्रांत चौधरी म्हणाले.

    भविष्यात व्यापक स्वरूप

    एक दुर्वाच्या माध्यमातून गरिब आणि गरजवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविता आली याचे फार मोठे समाधान आहे.भविष्यात गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाला अजुन व्यापक स्वरुप देउ असे समन्वयक अमित चौधरी यांनी नमूद केले.

    शिष्यवृत्ती सुरु करु

    अंतर्नादच्या माध्यमातून विविध प्रसंगी वर्षभर विद्यार्थ्यांना मदत केलीच जाते,पण दात्यांचे अधिकचे पाठबळ मिळाले तर येणाऱ्या काळात अंतर्नादतर्फे गरीब गरजवंत हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुध्दा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे प्रकल्प सह समन्वयक ललित महाजन यांनी नमुद केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.