शालेय विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप

0
26

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील पीपल्स सोशल फाउंडेशनच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त जयहिंद माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक खलाणे होते. यावेळी जिल्हा परिषद गटनेते शशिकांत साळुंखे, मा.उपनगराध्यक्ष भगवान पाटील, मा.शिक्षण सभापती रामचंद्र जाधव, मा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, डॉ.संदीप देशमुख, ॲड.निलेश निकम, योगेश पाटील, मुख्याध्यापक अभिजीत खलाणे, ॲड.आकाश पोळ (अध्यक्ष-पीपल्स सोशल फाउंडेशन), ब्रिजेश पाटील (अध्यक्ष-रोटरी क्लब, चाळीसगाव), डॉ.निकम, ॲड.कविता जाधव, शिवसागर पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील (संचालक-कृषी बाजार समिती चाळीसगाव), ॲड.प्रेम निकम, ॲड.तुषार पाटील, ॲड.मयूर निकम आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड.आकाश पोळ, रामचंद्र जाधव, अशोक खालणे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शशिकांत साळुंखे, भगवान पाटील, डॉ संदीप देशमुख, ॲड.निलेश निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.आकाश पोळ, उपाध्यक्ष शिवसागर पाटील, मुख्य संघटक शुभ महाजन, प्रणाल पवार, दीपक मोरे, स्वप्निल जाधव, सागर मोरे, सौरभ त्रिभुवन, प्रवीण जाधव, राकेश सरोदे, हर्षल माळी, साहिल आव्हाड, राकेश त्रिभुवन, सचिन पवार, सनी सरोदे, कुणाल पाटील, निशांत सरोदे आदींनी केले. सूत्रसंचालन विनोद सपकाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here