साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
शहरात विविध ठिकाणी रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने डॉ.अमरकुमार आनंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान प्रचार, प्रसारासाठी मलकापूर शहरातील द पीपल्स बहुउद्देशीय संस्था शाखा बुलढाणा, हिंदी मराठी पत्रकार संघ, लिगल फायटर्स फाउंडेशन मलकापूर महाराष्ट्र यांना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रत मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
डॉ. अमरकुमार तायडे संपूर्ण महाराष्ट्रात संविधान जागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम राबवित असतात. तसेच प्रगल्भ असा वैचारिक वारसा असल्याचे हा तरुण चालता बोलता आलेले एक विद्यापीठ आहे. डॉ.तायडे यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून घेतले आहे. तसेच देशातील अनेक लहान-मोठे पुरस्कारही त्यांच्या नावे आहेतच. ते नवनवीन प्रयोग निस्वार्थीपणे राबवत आहे.