महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्याकडून प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना( PMJJBY) अंतर्गत मयताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश वाटप,

0
60

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

यावल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेच्या वतीने मयत खातेदारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. यावल येथील रहिवासी कैलासवासी यतीन जनार्दन फालक व किशोर प्रकाश माळी परिवारावर तरुण मुलगा गमावण्याची वेळ आली त्यांच्या आई-वडील पत्नी व मुले निराधार झाले फालक व माळी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या LIC 436 रुपयाचा विमा काढला होता.

त्यामुळे मयतांच्या वारसास दोन लाख रुपये मिळावे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्यावतीने आतापर्यंत 14 मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन श्री मिलिंद धारड व क्षत्रिय व्यवस्थापक एस जे पाटील व शाखा व्यवस्थापक आर बी हिंगणेकर तसेच उपव्यवस्थापक श्री मयूर पवार व श्री विक्रम धकाते व कार्यालयीन सहाय्यक श्री अविनाश सोनोने व संदेश वाहक महेश खाचणे व भूषण महाजन, तसेच यावल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री राकेश मुरलीधर कोलते यांच्या हस्ते फालक व माळी कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख चा धनादेश वाटप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here