साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, धुमाळ क्लासेसच्यावतीने तसेच कुळवाडीभूषण समाज विकास संस्थेच्या सहाय्याने वीर भगतसिंह यांच्या जयंतीदिनी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. विद्यार्थ्यांना भगतसिंह यांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वीर भगतसिंह यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी जयश्री रणदिवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भगतसिंगांच्या कार्याची माहिती करून दिली. याप्रसंगी पंकज रणदिवे, आकाश धुमाळ, जयश्री रणदिवे, पंकज पाटील, भूषण सूर्यवंशी, राम दराखा, मनोज पाटील, शुभम पवार, विनोद शिंपी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.