चोपडा तालुक्यातील १२ शाळांमध्ये दीड हजार सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकांसह वह्यांचे वाटप

0
18

साईमत/ न्यूज नेटवर्क । चोपडा ।

येथील रोटरीसह रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन लेखन अभियान राबविण्यात आले. त्यात चोपडा शहरासह तालुक्यातील १२ शाळांमधील दीड हजार विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकांसह वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शहरातील महिला मंडळ शाळेत करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख दीप अग्रवाल, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, प्रकल्प प्रमुख प्रा.दिव्यांक सावंत, रोटरी क्लबचे सदस्य रूपेश पाटील, स्वप्निल महाजन, विलास पी.पाटील, विलास एस.पाटील, नयन महाजन, डॉ.ईश्‍वर सौंदाणकर, चंद्रशेखर साखरे, मयुरेश जैन, संजय बारी, शाळेचे मुख्याध्यापक अरूण संदानशिव आदी मान्यवरांच्या हस्ते उजळणी पुस्तकांसह वह्यांचे वाटप करण्यात आले.

साहित्य वाटपात या शाळांचा समावेश

तीन दिवसाच्या कालावधीत महिला मंडळ प्राथमिक विद्यालय, चोपडा, जि.प केंद्र शाळा, निमगव्हाण, जि.प प्राथमिक शाळा, तांदलवाडी, जि.प प्राथमिक शाळा, खडगाव, जि.प उच्च प्राथमिक शाळा, माचला, जि.प प्राथमिक मराठी मुलींची शाळा, अडावद, जि.प.प्राथमिक शाळा उनपदेव, जि.प केंद्र शाळा, चौगाव या शाळांमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन साहित्याचे वाटप केले. अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वच शाळांनी रोटरॅक्टसह रोटरी क्लबचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here