साईमत जळगाव प्रतिनिधी
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. जो तो आपापल्या परीने हा महोत्सव साजरा करीत आहेत. यानिमित्ताने रोटरी जळगाव रॉयल्स व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम करण्यात आला. शिक्षणा करीता लांब लांब पर्यंत पायी जाणं येणं करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना सायकलस वाटप करण्यात आल्या. जेणे करून त्यांचा वेळ वाचेल व तो वेळ त्या अभ्यासाला देऊ शकतील.
पंचरत्न गणेश मंडळ, नवी पेठ येथील सोहळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ चे अध्यक्ष सचिन नारळे व सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते शिवाजी नगर येथून नूतन मराठा महाविद्यालयात पायी जाणाऱ्या कु. जागृती किरण सोनार हिला एक सायकल तर नेहरू चौक मित्र या ठिकाणी कु. भाग्यश्री अशोक नाथ हिला एक सायकल जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी रोटरी जळगाव रॉयल्स तर्फे अध्यक्ष रो. सचिन जेठवनी, मानद सचिव रो. गोविंद वर्मा, प्रोजेक्ट चेअरमन रो. मनीष पात्रीकर, रो. भावेश शहा, रो. वल्लभ अग्रवाल, रो. भालचंद्र सोनवणे, रो. नारायण लाहोरी, रो. डॉ गौरव महाजन तर नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी व रींकेश गांधी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ तर्फे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, सुरज दायमा, राकेश तिवारी, राहुल परकाळे, दिपक दाभाडे, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, साई सराफ, अजय बत्तीसे आदी तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सूत्र संचालन मनीष पात्रीकर यांनी तर आभार डॉ. नीतल देशमुख यांनी मानले.