बोदवड पं.स.च्या माध्यमातून गरजूंसाठी राबविली योजना
साईमत/बोदवड/प्रतिनिधी
येथे पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातर्फे तालुक्यातील पाच दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलींचे वाटप नुकतेच करण्यात आले.
२०२२-२३ या वित्तीय वर्षात स्वतंत्र दिव्यांग निधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी व पाच टक्के निधीतून बॅटरीचलीत सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यासाठी तालुक्यातील पाच लाभार्थीची निवड झाली होती. त्यात कोमल मोरे (शेलवड), नंदकिशोर पाटील (वरखेड खुर्द), जनार्दन गायकवाड (साळशिंगी), भारत निकम (कोल्हाडी) आणि जुनोना येथील कडू सोनवणे ह्या लाभार्थींचा समावेश होता.
दिव्यांगांना सायकल वाटप करताना तहसीलदार अनिल वाणी, बीडीओ प्रदीप घांडे, नगराध्यक्ष आनंदा पाटील, विधान सभा क्षेत्र प्रमुख हितेष पाटील, नगरसेवक दिनेश माळी, गजानन खोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.