साईमत / बाराबंकी (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशमध्ये एका भयानक आणि निर्घृण घटनेमुळे समाज हादरला आहे. बाराबंकी जिल्ह्यातील सरयू नदीच्या पलीकडे वसलेल्या परसावल गावात शनिवारी दुपारी आईस्क्रीम खाल्ल्याचे पैसे मागितल्यावर संतप्त झालेल्या एका व्यक्तीने तरुणाची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेहटा गावातील बबलू राजभर (वय 26) हा आपल्या 12 वर्षांच्या चुलत भावासोबत घरापासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर परसावल गावात आईस्क्रीम विकायला गेला होता. तो माजरा नैपुरा परिसरात फिरून आईस्क्रीम विकत असताना, गावातील शंकर यादव (वय 52) यांनी 3 आईस्क्रीम खाल्ली. जेव्हा बबलूने त्याच्याकडून पैसे मागितले, तेव्हा शंकर यादव संतप्त झाले आणि त्याने जवळच्या घरातून विळा आणून बबलूवर जोरदार हल्ला केला.
या हल्ल्यात बबलू गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. मात्र, आरोपीने या हिंसेवर थांबून न राहता बबलूचे शीर धडावेगळं केले आणि ते चुलीत टाकून भाजू लागले. घटनास्थळी पोलीस धावले असता, आरोपी बबलूचे शीर चुलीत भाजताना आढळला. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता, त्याने सांगितले की तो शीर शिजवून खाणार होता.
या घटनेमुळे बाराबंकी जिल्हा आणि आसपासच्या परिसरात लोकांमध्ये मोठा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.
या धक्कादायक घटनेमुळे सामाजिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक प्रशासन नागरिकांमध्ये शांती राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
