साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या प्रलंबित आणि नवीन प्रकरणाबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच अशी प्रकरणे गेल्या ५ ते ६ महिन्यापासून त्रुटी दाखवून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. तसेच नवीन प्रकरणे सुद्धा दुर्लक्षित आहे ही प्रकरणे त्वरित मिटिंग घेऊन निकाली काढण्यात यावी, अन्यथा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे येत्या १५ डिसेंबर रोजी भीक मांगो आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात छेडण्यात येईल, असा इशारा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनमार्फत महसूल प्रशासनाला दिला आहे.
निवेदन देतेवेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष निलेश चोपडे, महाराष्ट्र सल्लागार पंकज मोरे, महाराष्ट्र सचिव शेख रईस, महाराष्ट्र सहसचिव संतोष गणगे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख दत्ता नारखेडे, जिल्हा सचिव शरद खूपसे, जिल्हा सहसचिव राजीव रोडे, मलकापूर तालुकाध्यक्ष निलेश अढाव, तालुका सचिव रामेश्वर गारमोळे, सदस्य अंकित नेमाडे, सदस्य दामोदर धोरण, सदस्य अशोक पवार, सदस्य निलेश सुरळकर, गोपाल हुलगे, अशोक भालशंकर, किसन तायडे, श्रीकांत फिरके, जाफर खान, पत्रकार अशोक गाढवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.