साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी
तालुक्यात विविध योजने अंतर्गत विकास कामात भेदभाव करीत असल्याने गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी झालेल्या पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या बैठकीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अक्कलकुवा तालुक्यातील सर्व सरपंचांनी बहिष्कार टाकला. याबाबत विधान परिषद आ.आमश्या पाडवी, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी विजय लोणढे यांना निवेदन देण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यात विविध विकास काम योजना अंतर्गत भेदभाव होत आहे. तसेच जन सुविधा योजना, ठक्कर बाप्पा योजना व बिरसा मुंडा योजना या योजना सर्व ग्रामपंचायतींनी कामे सुचविलेले असताना तसेच दोन ते तीनवेळा प्रस्ताव अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाला दिले होते. परंतु आजपर्यंत तिन्ही योजनांमधून एकही ग्रामपंचायतला एकही विकासकाम मंजूर झाले नाही. त्यामुळे व आमच्यावर होणाऱ्या भेदभावामुळे सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सरपंचांनी बैठकीवर बहिष्कार टाकत असल्याच्ये निवेदन देण्यात आले
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर सरपंच वसंत वसावे, बबीता वसावे, दुर्गा पाडवी, कंचन पाडवी, अश्विन तडवी, केतन वसावे, ललिता वळवी, जवराबाई पाडवी, योगेश तडवी, मोगरा वळवी, विकास पाडवी, मुन्नी वसावे, संगीता वळवी, रसीला वळवी, मेघावती पाडवी, अरविंद वसावे, कल्पना पाडवी, मुनिराज पाडवी, अजित तडवी, किरसिंग नाईक, अंजू पाडवी, उषा बोरा, कल्पना पाडवी, दिनेश वसावे, वासुदेव वसावे, रंजना पाडवी, अबेसिंग पाडवी, अनिता तडवी, इमरान मकरानी, रवींद्र वसावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.