साईमत जळगाव प्रतिनिधी
रेडक्रॉसच्या सिनिअर सिटीझन वेल्फेअर कमिटीमार्फत कळविण्यास आनंद होतो कि दि. १६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत जेष्ठ नागरीक (स्त्री, पुरुष) ज्यांचे वय ६० वर्षाच्या वर आहे अशांना सवलतीच्या दारात फिजिओथेरपीचे उपचार दि. १६ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आले आहे.
उपचार घेणाऱ्या जेष्ठ नागरीकांना आधार कार्ड छायांकित प्रत आणून रेडक्रॉस व्यवस्थापनेकडे फिजिओ थेरपी उपचारासाठी आपली नावे नोंदवावीत. फिजिओ थेरपीसाठी उपलब्ध मशिनरी साहित्याद्वारे व तज्ञ डॉक्टराकडून गुढगे, पाय, कंबर, मान व पाठ दुखी, फ्रोझन शोल्डर व इतर आजारावर फिजिओ थेरपीने उपचार तपासणी करून सुरु करण्यात येईल. जेष्ठ नागरिकांनी आधार कार्ड व आजारासाठी काढलेले त्या भागाचे एक्स रे, फोटो व डॉक्टरांचे प्रीस्क्रीप्शन असल्यास सोबत घेउन यावे.
जेष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेडक्रॉस जेष्ठ नागरिक समिती चेअरमन धनंजय जकातदार, रेडक्रॉस उपाध्यक्ष गनी मेमन व चेअरमन विनोद बियाणी यांनी केले आहे.