साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलमध्ये चेअरमन, सचिव यांच्यासह संचालकांनी दैनिक ‘साईमत’मध्ये प्रकाशित झालेल्या सर्व वृत्तांची दखल घेत शाळेत शिस्त लावली आहे. त्यामुळे पालकांनी ‘साईमत’सह प्रस्तुत प्रतिनिधीचे आभार मानले आहेत. शाळेत सकाळी असलेले जास्त शिक्षक दुपारी शिकवित होते. त्यांना पुन्हा सकाळची वेळ देणार आणि तुकड्यात झालेल्या बदल पुन्हा नियमाने केल्या जातील, अशी ग्वाही सचिवांनी प्रतिनिधीजवळ दिली.
शाळेत सीसीटीव्ही पुन्हा सुरु करून योग्य दिशेवर कॅमेरे लावले गेले. शिक्षक कर्तव्यावर असतांना आपली खासगी काम करायची त्या विषयावर संचालकांनी शाळेच्यावेळी बाहेर न जाण्याचे आदेश दिले. गुटखा, तंबाखूसारखी व्यसने शाळेच्या आवारात करण्यास बंदी घातली. खासगी क्लासेस शिक्षकांना आता घरी घेण्यासाठी बंदी केली. तसे शिक्षकांकडून हमीपत्र लिहून घेतले. शिक्षक भरती नियमानुसारच होईल, असे सचिवांनी सांगितले. कोणताही गैरप्रकार यात होणार नाही. आम्ही पारदर्शक राहू, असे मत त्यांनी व्यक्त केले. नवीन शिक्षक भरतीत जो प्रतिनिधी नियमात बसेल, त्याला शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येईल, असेही सचिवांनी सांगितले.