साईमत, यावल : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील मोहमांडली ग्रुप ग्रामपंचायतपासून ४०० ते ५०० मीटर अंतरावरील ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये पावसाचे घाण पाणी वाहून जाऊन विहिरीतील पाणी अशुद्ध झाल्याने आदिवासी बांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मोहमांडली येथील गाव विहिरचे पिण्याचे पाणी पूर्णपणे पावसाच्या पाण्यामुळे खराब झालेले आहे. मात्र, मोहमांडली येथील सरपंच आणि ग्रामसेवक हे त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पिण्याच्या पाण्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी, आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.