आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सुमेध तळवेलकर यांची पोस्ट विभागात थेट नियुक्ती

0
42
आंतरराष्ट्रीय-सॉफ्टबॉल-खेळाडू-सुमेध-तळवेलकर-यांची-पोस्ट-विभागात-थेट-नियुक्ती-www.saimatlive.com

साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव

भारतीय डाक विभाग व नवी दिल्ली येथे जळगाव येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू व प्रशिक्षक श्री. सुमेध प्रदीप तळवेलकर यांची थेट नियुक्ती दिल्ली येथे डाक विभागात करण्यात आली आहे. सुमेधने तीन वेळा भारतीय सॉफ्टबॉल संघाचे प्रतिनिधित्व केलेले असून नॅशनल गेम्स मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे तसेच सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत चार वेळा अजिंक्य प्राप्त केलेले आहे.

सुमेध बरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी प्रियंका नहाळे, प्रवीण दवे,किशन कुमार,प्रकाश कुमार या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडूंनाही डाक विभागात संधी मिळाली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल मा.ना गिरीश महाजन, मा. आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे ,पी.ही पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक प्रशिक्षक किशोर चौधरी, राज्य सॉफ्टबॉल संघटना सहसचिव श्री गोकुळ तांदळे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here