विठ्ठलाच्या जयघोषात उमाळ्यात निघाली दिंडी

0
14

उमाळे : साईमत लाईव्ह प्रतिनिधी

श्रद्धेला मानवी एकात्मतेची गुंफण देणारी, परस्परांमधील आत्मीयता , आदर आणि बंधुभाव टिकवून ठेवणारी वारकरी संप्रदायाची परंपरा निरंतर सुरू राहावी , सर्वावरील कोरोनाचे सावट पूर्णपणे निघून जावे, ही मनोकामना ठेवत.

आज आषाढी एकादशी निमित्ताने , माध्यमिक विद्यालय उमाळे ता.जि.जळगांव येथे , मुख्याध्यापक गणेश सोनवणे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली , इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांस्कृतिक वेशभूषा परिधान करत लेझीम, पाऊली , विठ्ठलाच्या नामघोषासह दिंडी काढली, त्याप्रसंगी ग्रामपंचायत उमाळे येथील प्रथम नागरिक सौ. संगीता योगेश खडसे – सरपंच आणि श्री. योगेश खडसे यांच्या हस्ते पालखीची पुजा करून सुरुवात करण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांना साबूदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले , या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी, ग्रामपंचायत उपसरपंच श्री.सुरेशभाऊ धनगर, सदस्य श्री.राजुभाऊ पाटील श्री.योगेश सोनवणे ,श्री.संदीपभाऊ बिऱ्हाडे, विकास सोसायटी चेरमन श्री. अरुण हरी पाटील , सदस्य सुभाष पाटील, जितेंद्र खडसे, युवराज बिऱ्हाडे , शिवाजीभाऊ मांडे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.देवीदासभाऊ कोळी, श्री.अनिल खडसे, श्री.ज्ञानेश्वर खडसे, श्री.भगवान खडसे, श्री.सुमितभाऊ धनगर, श्री.ज्ञानेश्वरभाऊ मांडे, श्री.प्रवीण खडसे, श्री.संजय शिंदे, श्री.विनोद खडसे, संदीप पाटील श्री.प्रमोद मोरे , श्री.गणेश खडसे , श्री. जगन्नाथ खडसे, आदींची उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here