‘दिल दिया है जान भी देंगे… ए वतन तेरे लिए’

0
48

स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, अनेकांचा गौरव, विविध उपक्रमांचा समावेश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

‘दिल दिया है जान भी देंगे… ए वतन तेरे लिए’ असे देशभक्तीपर वातावरण निर्माण होऊन यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच अनेकांचा गौरव, विविध उपक्रम राबविण्यात आले.

प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

चाळीसगाव : येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी देशभक्तीवर गीत सादर करण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडून पोलिसांनी परेड सादर करून मानवंदना दिली. यावेळी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ, आ.मंगेश चव्हाण, विकास लाडवंजारी, महसूल कर्मचारी, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, नगरपालिकाचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल बैसाणे, स्वातंत्र्य सैनिक, प्रशासकीय इमारतमधील सर्व कार्यालय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षाचे विविध पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अँग्लो उर्दू हायस्कुल

ए.ए. शाह एज्युकेशन सोसायटी संचालित अँग्लो उर्दू हायस्कुल येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मुबारक बेग मारुफ बेग जहागीरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक युसुफ शाह अजीज शहा, अहमद खान दौलत खान, इकबाल खान सत्तार खान तसेच शाळेचे मुख्याध्यापक आसिफ खान, सर्वश्री इक्बाल, झाकीर, हुसैन, अफसर, जहीर, जफर, मसरूर, आरिफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते सलीम अयुब सय्यद, अशपाक बेग आझम बेग जहागीरदार, आरिफ आयुब सय्यद यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

गतिमंद निवासी विद्यालय

येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मधुकरराव वाघ (डॉ. राहुलदेव वाघ यांचे वडील) आणि डॉ. वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेसाठी वाघ कुटुंबियांनी होम थिएटर भेट दिले. कार्यक्रमात अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शाळेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आली. यावेळी विशेष प्रसंगाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. शेवटी सर्व उपस्थितांचे मुख्याध्यापक विजयालक्ष्मी सूर्यवंशी यांनी आभार मानले.

देवळी आश्रमशाळा

देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार खैरनार यांनी प्रतिमा पूजन केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत लेझीम पथक, ढोल पथक त्याचप्रमाणे विविध नृत्य, गीत, गायन व वक्तृत्व सादर करण्यात आले. शाळेतील शिक्षक राजू पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दीपमाला जाधव, भूषण बहिरम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार जितेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.

ब्राम्हणशेवगेला वृक्षारोपण

ब्राम्हणशेवगे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच नम्रता हेमराज बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण, जि.प.प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण उपसरपंच पिनाभाऊ दाभाडे यांच्या हस्ते तर माध्यमिक शाळेचे ध्वजारोहण दहावीत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थांच्या हस्ते तर “हर घर तिरंगा” उपक्रमाअंतर्गत निसर्गटेकडीवरील ध्वजारोहण फौजी जगदीश अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मिशन ग्रीन ब्राम्हणशेवगे अंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आईचे झाड माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमराज माधवराव बाविस्कर, सरपंच नम्रता हेमराज बाविस्कर यांच्या हस्ते लावण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले.
सुरवातीला गावातून जि.प. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. ‘स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आदी घोषणांनी गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण केले. माध्यमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, जि.प.प्राथमिक, माध्यमिक शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलीस पाटील, तलाठी, आरोग्य कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

अडावद उर्दू हायस्कुलमध्ये ध्वजारोहण

अडावद, ता.चोपडा: येथील अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये संस्थाध्यक्ष कबिरोद्दीन दिलफरोज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक मंडळ, गावातील नागरिक उपस्थित होते.

जामनेरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत तिरंगा रॅली

जामनेर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत ना.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅलीचे अयोजन केले होते. शहरातील नागरिकांसह इंदिराबाई ललवाणी आणि ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अभियानात माध्यमिक विभागाकडून तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा मेळा आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित राहण्यासाठी देशाच्या भावी पिढीने देशहिताचा संकल्प करण्याची गरज अाहे. विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहीम अंतर्गत देश भावना घराघरात राबविण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांनी घ्यावी] असे आवाहन केले होते. रॅलीत शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

तळेगावला गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण

जामनेर : तालुक्यातील तळेगाव येथे लेझिम, ढोल ताशांच्या तालावर प्रभातफेरी काढून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच तळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक आत्माराम पाडोळसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि. प. शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैला सुनील कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच माध्यमिक विद्यालयात भावेश भिका कांबळे इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील जयश्री पाटील यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक भागवत संपत माळी यांनी देशभक्तीपर गीत गाऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीते सादर केले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक, शा.व्य.समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here