धुळे: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या धरती देवरे बिनविरोध

0
9

धुळे : प्रतिनिधी
धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर धरती निखिल देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाचा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी ही निवडणूक झाली. भाजपच्या विशेष बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी देवरे यांचे नाव निश्चित केल्यामुळे त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
जिल्हा परिषदेमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासह विविध विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. दरम्यान, पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदावरून अश्विनी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ कॅम्पसमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठक झाली. यावेळी भाजपकडून निरीक्षक म्हणून आमदार राजूमामा भोळे व भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सर्व जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली. चौधरी यांनी अध्यक्षपदासाठी धरती देवरे यांचे नाव जाहीर केले.
यावेळी खा. डॉ. हिनाताई गावित, खा. डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी अध्यक्ष सुभाष देवरे, माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रा. अरविंद जाधव आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here