लखनऊत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दि अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, धरणगाव बँकेला उत्कृष्ट सायबर सिक्युरिटी प्रणालीबाबत बँकिंग फ्रंटीयर्स यांच्याकडून दिला जाणारा ‘बेस्ट सायबर सेक्युरिटी’ पुरस्कार लखनऊ येथे नुकत्याच झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.देशभरातून सहकारी बँकांनी पुरस्कारासाठी नामांकन दाखल केले होते. त्यात दी अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, धरणगाव बँकेची निवड दोनशे रुपये कोटी ठेवींच्या वर्गवारीत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी करण्यात आली. पुरस्काराचे संपूर्ण श्रेय बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांचे असल्याची भावना बँकेचे चेअरमन प्रवीण कुडे यांनी व्यक्त केली.
बँकेस यापूर्वीही अविज पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्यातर्फे दिला जाणारा ‘बँक ब्लू रिबन’ पुरस्कार २०२० मध्ये तृतीय क्रमांक, २०२१ मध्ये ‘परीक्षक’ पुरस्कार, २०२२ मध्ये तृतीय क्रमांक आणि २०२३ मध्ये प्रथम क्रमांक असे सलग चार वर्षे प्राप्त झाला आहे. तसेच पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक हा नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस प्राप्त झाला आहे. ही आपल्या बँकेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मनोगत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलभाई गुजराथी यांनी व्यक्त केले.
पुरस्काराबद्दल बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव
बँकेच्या एरंडोल शाखेचा गेल्या बुधवारी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी प्रथम वर्धापन दिन तसेच २५ ऑक्टोबर रोजी जळगाव शाखेचा २३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक यांनी सत्यनारायण महाप्रसादाचा लाभ घेतला. बँकेस मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.